मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज (Coronavirus) बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. तर दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित घटली असली, तरी कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील घटल्याने राज्यातील करोना संसर्गाची आजची स्थिती तुलनेने दिलासादायक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार २८६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ३२० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ९३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ०५० इतकी होती. तर, आज ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ६१ इतकी होती. (maharashtra registered 3286 new cases in a day with 3933 patients recovered and 51 deaths today) आज राज्यात झालेल्या ५१ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ५७ हजार ०१२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के इतके झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- सक्रिय रुग्णांचा ग्राफ येतोय खाली आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३८ हजार ४९१ इतकी आहे. काल ही संख्या ३९ हजार १९१ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र पुण्यातील ही रुग्णसंख्या आज घटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ५३० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ६ हजार ०१२ आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ५०२ वर आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार २१२ अशी आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ६३५ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ८०३ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत उपचार घेत आहेत ५,२७८ रुग्ण मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार २७८ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६९३ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६२९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९७० इतकी आहे. नंदुरबार, धुळे आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १३२ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ९४ वर आली आहे. तर नंदुरबार, धुळे आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी ३ सक्रिय रुग्ण आहेत. क्लिक करा आणि वाचा- २,५८,६५३ व्यक्ती होम क्वारंटाइन आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७८ लाख १९ हजार ३८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३७ हजार ८४३ (११.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६५३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.