बायडन यांनी मोदींना सांगितला मुंबईतला किस्सा अन् सर्वच हसले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 25, 2021

बायडन यांनी मोदींना सांगितला मुंबईतला किस्सा अन् सर्वच हसले!

https://ift.tt/39BFjEU
वॉशिंग्टनः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष आणि यांच्यात शुक्रवारी रात्री एक तासाहून अधिक काळ द्विपक्षीय बैठक चालली. जो बायडन हे या वर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले. यानंतर पंतप्रधान मोदींची त्यांच्यासोबतची ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती. भारत आणि अमेरिकेतील दृढ संबंधांसाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जातेय. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी उपराष्ट्रती असताना मुंबई भेटीतला एक किस्सा सांगितला. आपल्याला भारतीय वंशाच्या महिलेशी लग्न करायचं होतं. पण आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बायडन आडनावाचेही लोकही भारतात राहतात. तुमचे कोणी नातेवाईक आहेत का? असं आपल्याला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं. बायडन आडनावाची जवळपास ५ जण असल्याचं त्यावेळी पत्रकारांमधूनच आपल्याला कोणीतरी सांगितलं. मग त्यांना शोधून भेटलं पाहिजे, असं बायडन यांनी म्हणताच उपस्थित सर्वांना हसू आलं आणि बायडनही हसू लागले. बायडन यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांना माहिती दिली. 'तुम्ही 'बायडन' आडनाव असलेल्या भारतातील लोकांचा उल्लेख केला. तसंच तुम्ही माझ्याशी चर्चा केली होती. मी काही कागदपत्रे धुंडाळली आहेत. ही कागदपत्रे मी माझ्याबरोबर आणली आहेत. कदाचित ती तुमच्या कामी येतील', असं म्हणाले. यापूर्वी जेव्हा मी अमेरिकेचा उपाध्यक्ष होतो, तेव्हा मी या खुर्चीवर बसायचो. मात्र, आता मी अध्यक्ष आहे आणि तुम्ही माझ्या खुर्चीवर बसला आहात, असं अध्यक्ष बायडन हे पीएम मोदींचे स्वागत करताना म्हणाले.