भूपेंद्र पटेल घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, अमित शहा उपस्थित राहणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 13, 2021

भूपेंद्र पटेल घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, अमित शहा उपस्थित राहणार

https://ift.tt/3tEWte6
अहमदाबादः आपल्या कार्यकर्त्यांमध्ये 'दादा' नावाने लोकप्रिय असलेले भूपेंद्र रजनीकांत पटेल ( ) हे आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या १०३ आमदारांनी आणि पक्ष नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर ५९ वर्षीय भूपेंद्र पटेल हे आता गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. आज फक्त भूपेंद्र पटेल यांचाच शपथविधी होणार आहे. तर मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी हा दोन दिवसांनी होणार आहे. भूपेंद्र पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री , मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. भूपेंद्र पटेल हे अहमदाबादच्या घाटलोडिया मतदारसंघाचे आमदार आहेत. होणारे भूपेंद्र पटेल हे पाचवे पाटीदार आहेत. तर कडवा पाटीदार समाजाचे ते पहिले मुख्यमंत्री होतील. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपने राज्यातील पाटीदार समाजाच्या मतांवर सांधण्यासाठी पुन्हा एकदा पाटीदार समाजातील नेत्याची मुख्यमंत्रीपद निवड केली आहे. भूपेंद्र पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधीचा कार्यक्रम हा गांधीनगरमध्ये राजभवनात आज दुपारी २.२० ला होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत हे शपथ देतील. भूपेंद्र पटेल यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. गुजरातच्या राजकारणात अतिशय लो प्रोफाइल असलेले भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री होतील, याचा अंदाज कुणीही केला नव्हता. भाजपने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करून सर्वांनाच धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदावर पेच कायम गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची भाजपने निवड केली. पण उपमुख्यमंत्रीपदाबाबत पक्षात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मुख्यमंत्री होणाऱ्या भूपेंद्र पटेल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भूपेंद्र पटेल हे आपले जुने मित्र आहेत. ते मुख्यमंत्री होणार असल्याने आनंदच आहे. गरज पडल्यावर आपलं मार्गदर्शनही त्यांनी मागितलं आहे, असं नितीन पटेल म्हणाले.