'मुंबई महापालिकेवर काँग्रेसचाच तिरंगा फडकणार' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 2, 2021

'मुंबई महापालिकेवर काँग्रेसचाच तिरंगा फडकणार'

https://ift.tt/3BtQNpM
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेत आमचे २९ नगरसेवक असताना त्यातील तीन नगरसेवक प्रजा फाउंडेशनच्या अहवालात पहिल्या दहा क्रमांकात आाहेत. यातून आमच्या पक्षाची कामगिरी आणि कार्यक्षमता दिसून येते. यामुळेच मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षातर्फे स्वबळावर २२७ जागा लढविण्यात येतील. मुंबई महापालिकेवर काँग्रेसचाच तिरंगा फडकणार, असा दावा मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी बुधवारी स्पष्ट केले. प्रत्येक क्षेत्रात एक स्ट्राईक रेट असतो. ज्यांचे ९७ नगरसेवक आहेत त्यांचा स्ट्राईक रेट तुम्ही बघा. ज्यांचे ८२ नगरसेवक आहेत त्यांचा स्ट्राईक रेट तुम्ही पाहा. काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. त्यातील तीन प्रजा फाउंडेशनच्या अहवालाच्या टॉप टेनमध्ये आहेत, त्यात पहिल्या क्रमांकावर आमचे नगरसेवक रवी राजा आहेत. यावरून कळते की आमच्या पक्षाच्या नगरसेवकांची कामगिरी अव्वल दर्जाची आहे, असे जगताप म्हणाले.