ठाणेः ठाण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाली आहे. जखमींमध्ये १४ वर्षांच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे. ठाण्यातील राबोडी परिसरात ही दुर्घटना आज पहाटे घडली आहे. राबोडी परिसरात असलेल्या चार मजली खत्री इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली तीन जण दबले गेले. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचाः तिसऱ्या मजल्यावरील छताचा भाग कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. या आवाजामुळं इमारतीतील इतर रहिवाश्यांनी बाहेर धाव घेतली. त्यानंतर रहिवाशांनी तात्काळ ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांनी बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. तसंच, टीडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं व रुग्णालयात दाखल केलं आहे. वाचाः ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवानांनी ७५ जणांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या इमारतीच्या एकूण तीन विंग असून त्या तिन्ही विंग धोकादायक आहेत. सध्या ७५ जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. वाचाः