पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री यांच्या खास निकटवर्तीयांपैंकी एक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते यांनी बुधवारी एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. 'तालिबान ही संस्कृती आहे' असं म्हणतानाच जगदानंद सिंह यांनी संघाची तुलना तालिबानशी केलीय. () पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान जगदानंद सिंह बोलत होते. तालिबान्यांकडून ज्याप्रमाणे नि:शस्त्र लोकांवर हल्ले केले जातात त्याचप्रमाणे संघींकडून गरीब लोकांना मारहाण केली जाते, अशी टीका सिंह यांनी वर केलीय. 'तालिबान हे केवळ एक नाव नाही तर अफगाणिस्तानातील एक संस्कृती आहे. ही भारतातला तालिबानी आहे. हे लोक इतरांची दाढी कापतात. बांगड्या विकणाऱ्या आणि गाड्यांचं पंक्चर काढण्यासारखं काम करून मेहनत करून खाणाऱ्या लोकांना मारहाण करतात. मग अशा लोकांविरोधात आम्ही उभे राहणार नाही का... हेच तर जनतेच्या नेत्याचं कर्म आहे', असं त्यांनी यावेळी म्हटलंय. 'म्हणून लालू तुरुंगात गेले...' धनाढ्यांविरोधात आवाज उंचावला, धार्मिक उन्मादाविरोधात आवाज चढवला, हिंदू मुस्लीम एकतेच्या गोष्टी केल्या म्हणून आमचे नेते लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात जावं लागलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, चारा घोटाळ्यात वेगवेगळ्या प्रकरणी दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. 'जगदानंद यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय' जगदानंद सिंह यांच्या या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यूत्तर दिलंय. 'लालू यांच्या कुटुंबाची भक्ती, पुत्र मोह आणि वोटबँकेचं राजकारण करताना जगदानंद इतकी खालची पातळी गाठतील याचा कुणीही विचार केला नसता. राजदच्या छोट्या राजकुमारांच्या इच्छेनुसार काम करण्यासाठी आणि मोठ्या राजकुमारांकडून सतत अपमानित होण्याच्या दबावाखाली जगदानंद आपलं मानसिक संतुलन हरवत चालले आहेत. यासाठी ते हिंसाचारावर विश्वास ठेवणाऱ्या क्रूर तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करत आहेत', असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलंय.