धक्कादायक! कोवीन अ‍ॅप हॅक करून १६ जणांनी घेतली करोना प्रतिबंधक लस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 2, 2021

धक्कादायक! कोवीन अ‍ॅप हॅक करून १६ जणांनी घेतली करोना प्रतिबंधक लस

https://ift.tt/3gSLWXx
औरंगाबाद: हॅक करून लस न घेतलेल्या १६ जणांना लस घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात अ‍ॅप हॅक करणाऱ्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस निरिक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरेफ कॉलनी भागासह आसपास राहणाऱ्या नागरिकांसाठी डीकेएमएम कॉलेज येथे लसीकरण केंद्र देण्यात आले होते. २८ ऑगस्ट रोजी या केंद्रावर लसीकरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नावांची नोंद करून त्यांना क्रमानुसार लस देण्यात येत होते. या आरोग्य केंद्रावर दिवसभरानंतर एकुण ५५ जणांनी लस घेतली असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. क्लिक करा आणि वाचा- मात्र, संकेतस्थळावर नोंदणीकृत असलेल्या या डिकेएमएम लसीकरण केंद्रावर तब्बल ७१ जणांनी शनिवारी (२८ ऑगस्ट) लस घेतल्याचा अहवाल दाखविण्यात आला होता. शनिवारी दिवसभरात ५५ जणांनी लस घेतलेली असताना, ७१ जणांनी लस घेतल्याच्या अहवाल आल्यानंतर डॉ. अमरीन कादरी यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली होती. या प्रकरणात अखेर १ सप्टेंबर रोजी वैदयकिय अधिकारी डॉ. अमरिन कादरी यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-