अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 24, 2021

अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीने पोलीस ठाण्यातच केली आत्महत्या

https://ift.tt/3kAL0Jz
अमरावती : अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्यात एका ५० वर्षीय आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अरुण बाबाराव जवनजाळ (वय ५० रा.आष्टी) असं मृतक आरोपीचं नाव आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अरुण जवनजाळ याला वलगाव पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं होतं. मात्र सायंकाळच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर वलगाव पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. दरम्यान, महिन्याभरापूर्वीच राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत एका २३ वर्षीय आरोपीने आत्महत्या केली होती. त्यानंतर गुरुवारी ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या वर्तुळातही खळबळ उडाली आहे.