गुजरातचे नवे मुख्यमंत्री आज निवडले जाणार, भाजपची दुपारी ३ वाजता बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 12, 2021

गुजरातचे नवे मुख्यमंत्री आज निवडले जाणार, भाजपची दुपारी ३ वाजता बैठक

https://ift.tt/39fkjDT
गांधीनगरः गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याची ( ) उत्सुकता वाढली आहे. विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी २ वाजता होणार आहे, असं आधी सांगण्यात येत होतं. पण आता ही बैठक दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती गुजरात भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली. गांधीनगरमध्ये ही बैठक होणार आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी ३ वाजता बैठक होत आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय संसदीयक कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पक्षाने निरीक्ष म्हणून पाठवलं आहे. पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघही अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. गुजरातल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही आधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करू, असं अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या तोमर यांनी सांगितलं. आम्ही आधी गुजरातमधील पक्षाच्या नेत्यांची चर्चा करू. याची माहिती पक्षनेतृत्वाला दिली जाईल. पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असं केंद्रीय मंत्री आणि गुजरातसाठी पाठवण्यात आलेले पक्षाचे निरीक्षक प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गुजरात विधिमंडळ पक्षाची बैठक आज दुपारी ३ वाजता होणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद जोशी आणि भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ यांच्या प्रमुख उस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत गुजरातचा नवीन मुख्यमंत्री निवडला जाईल, अशी माहिती गुजरात भाजपचे मुख्य प्रवक्ते यामल व्यास यांनी आज गांधीनगरमध्ये दिली. नवीन मुख्यमंत्रीपदासाठी प्रक्रिया सुरू झाली असताना आता नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे प्रफुल्ल खोडा पटेल यांचं नाव चर्चेत आहे. प्रफुल्ल खोडा पटेल आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यापैकी एकाची मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भाजपच्या सूत्रांनी सांगितलं. गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजपकडून शक्तिशाली पटेल समाजाला खुश करण्यासाठी डाव-पेच सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि यांच्यासह उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचीही नावं आहे, असं सूत्रांनी सांगितल. मनसुख मांडवीय अलिकडेच केंद्रीय आरोग्यमंत्री झाले आहेत. तर नितीन पटेल गुजरातचे उपमुख्यमंत्री आहेत. विजय रुपानी यांनी शनिवारी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 'आपल्याला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा आभारी आहे', असं रुपानी म्हणाले. 'गुजरातच्या विकासाची यात्रा नवे नेतृत्व, नवा उत्साह आणि नव्या ऊर्जेसोबत पुढे गेली पाहिजे. हे लक्षात घेऊन आपण गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला', असं रुपानी यांनी सांगितलं.