
म. टा. प्रतिनिधी, पाचोरा येथील कृष्णापुरी भागात राहणारा एक तरूण नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला. असे या तरुणाचे नाव आहे. उत्तम पोहता येत असताना देखील तो स्वत:ला प्रवाहाबाहेर काढण्यात अपयशी ठरला. हा युवक अद्याप सापडलेला नाही. यापूर्वी आठ दिवसांपासून शिंपी नामक युवक अद्याप बेपत्ता आहे. (despite being able to swim well, the in pachora in ) येथील हिवरा नदीत कृष्णापुरी भागात जोडणारा नदीचा पुल ऐन पावसाळ्यात तोडल्याने पुलाचे काम झाले नाही मात्र बळी मात्र जात आहेत. आज पुन्हा एक बळी गेला असल्याने चिंता वाढली आहे. शासनाच्या परीपत्रकानुसार ऐन पावसाळ्यात रस्ते किंवा पुलाची कामे करु नये. असे असतांना पाचोरा नगर परिषदेकडून शहरातील सर्व मुख्य रस्ते फोडून ठेवले आहेत. तर, पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडण्यात येणारा महत्त्वाचा पुल तोडण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- आज दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला. उत्तम पोहता येत असताना देखील तो स्वताला बाहेर निघण्यास अपयशी ठरला. नगरपरिषदेने जबाबदारी घेवून तात्काळ त्या परिवाराला नगरपरिषदेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- भराव वाहून गेल्याने वाहतुक ठप्प जळगाव पाचोरा रस्त्यावरील वावडदा गावा जवळील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यावर टाकलेले भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपार पासून ठप्प झाली होती. बसेस देखील पहूर मार्गाने वळविण्यात आली. क्लिक करा आणि वाचा-