शहरी भागांत खासगी लसमात्रा अधिक; मुंबईला दिल्या ९८ लाख मात्रा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 10, 2021

शहरी भागांत खासगी लसमात्रा अधिक; मुंबईला दिल्या ९८ लाख मात्रा

https://ift.tt/3nkDFQe
म. टा. विशेष प्रतिनिधी, खासगी लसीकरण केंद्रावरील लसीकरणाचा वेग अधिक नसला तरीही शहरी भागांत त्याला मिळालेला प्रतिसाद अधिक आहे. मात्र ग्रामीण भागात प्रमाण कमीच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबईमध्ये या क्षेत्रातून ९८ लाख १८ हजार ३४० मात्रा देण्यात आल्या आहेत. सात दिवसांपूर्वी राज्यात ८७ लाख ३६ हजार मात्रा देण्यात आल्या होत्या, त्यात जवळपास ६७ टक्के लसीकरण हे मुंबई आणि पुण्यात झाले होते. १० जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून अधिक लसीकरण झाले असले तरी शहरांपुरतेच मर्यादित राहिले आहे. सात दिवसानंतर एक लाख मात्रा खासगी क्षेत्रातून देणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, पालघर, नागपूर, सातारा, कोल्हापूर यांचा सहभाग आहे. खासगी रुग्णालयांनी चार महिन्यांपूर्वी लस उपलब्धतेसाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतरही उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झाली नाही. नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांनी एकत्रितरित्या ही नोंदणी उत्पादकांकडे केल्यानंतर मात्रांचा साठा उपलब्ध झाला. मात्र काही दिवसांनी सरकारने विनामूल्य लसीकरणासाठी अधिक वेगाने मोहीम राबवली. त्यामुळे तुलनेने महाग असलेल्या खासगी केंद्रामधील लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवली. ग्रामीण भागांमध्ये झालेल्या खासगी केंद्राकडे मात्रांची उपलब्धता नसल्याचे व जिथे थोडी उपलब्धता आहे तिथे प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अशी आहे स्थिती मुंबईमध्ये दिलेल्या मात्रांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४०,८४,७८८ इतकी असून पुण्यात २५,६५,४८३ तर ठाणे इथे १५,८६,५४० मात्रा खासगी क्षेत्रात दिल्या. रायगड मध्ये ३,१९,३१३ तर नाशिकमध्ये २,१९,७०५ औरंगाबादमध्ये २,१६,१५७ पालघरमध्ये २,०९,८६९ मात्रा दिल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून कळते.