प्रसूतिगृहात महिलेचा दुर्लक्षामुळे मृत्यू? - Times of Maharashtra

Wednesday, September 29, 2021

demo-image

प्रसूतिगृहात महिलेचा दुर्लक्षामुळे मृत्यू?

https://ift.tt/3iip1W5
photo-86602438
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुलुंडमधील एम. जी. रोड येथील टी विभागातील प्रसूतिगृहात दाखल झालेल्या महिलेचा २८ सप्टेंबर रोजी पहाटे ४च्या सुमारास दुर्लक्षामुळे मृत्यू ओढवल्याचा आरोप मुलुंडमधील भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित चुकार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी कोटेचा यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि मुलुंड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मुलुंडमध्ये पालिकेच्या टी विभाग प्रसूतिगृहात निशा कसबे २७ सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र २४ तास डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार रहिवाशांनी वारंवार करूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही पत्रात नमूद केले आहे. या प्रसूतिगृहात २४ तास डॉक्टर उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु, तिथे अर्धा दिवसच डॉक्टर असतात, अशी तक्रार वारंवार करण्यात आली आहे. मुलुंडच्या टी विभाग प्रसूतिगृहात दाखल झालेल्या कसबे यांची प्रकृती रात्री बिघडली. मात्र तेव्हा डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना मुलुंड पूर्वेतील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. परंतु तेथेही डॉक्टर नसल्याने कसबे यांचा पहाटे ४च्या सुमारास मृत्यू ओढवल्याचे कोटेचा यांनी म्हटले आहे. पालिका रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतील, तर हा रुग्णांच्या जिवाशी खेळ आहे. त्यामुळे त्यात दोषी असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही कोटेचा यांनी केली आहे. मुंबईकरांच्या हिताची काळजी न घेण्याऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा देण्याची मागणीही कोटेचा यांनी ट्विटरवरून केली आहे.

Pages