
पुणेः इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. हा प्रकार आज घडला. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या इंदूर एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकात रुळावरुन घसरल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. इंदूर एक्सप्रेस सकाळी सात वाजून ५७ वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे (जनरल) रुळावरून घसरले. वाचाः एक्स्प्रेसचे दोन डबे रूळावरुन घसरल्यानंतर डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. वाचाः