
दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात रविवारी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीच्या हर्षल पटेलने कमालच केली. त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅटट्रिक घेतली. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील १८वा गोलंदाज ठरला आहे. तर आरसीबीकडून तो तिसरा गोलंदाज ठरलाय. या विजयामुळे आरसीबीने १२ गुणांसह गुणतक्त्यातील तिसरे स्थान भक्कम केले. तर मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेलाय. वाचा- हर्षल पटेलने या हंगामातील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या लढतीत पाच विकेट घेतल्या होत्या आणि काल त्याने चार विकेट घेतल्या. मुंबई विरुद्ध २ सामन्यात त्याचे ९ विकेट झाल्या आहेत. वाचा- या सामन्यात १७व्या षटकात हर्षलने पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याला बाद केले. हर्षलची ही या हंगामातील २०वी विकेट ठरली. त्यानंतर हर्षलने कायरन पोलार्डची बोल्ड घेतली. तिसऱ्या चेंडूवर त्याने राहुल चाहरला बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. वाचा- प्रवेश आरसीबीने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६५ धावा केल्या होत्या. उत्तरदाखल मुंबईला रोहित शर्माने चांगली सुरूवात करुन दिली होती. पण त्याचा डाव १११ धावा संपुष्ठात आला.