पोलीस दलात एसीपी असल्याचे सांगून मॉडेलचा 'सोशल' छळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 22, 2021

पोलीस दलात एसीपी असल्याचे सांगून मॉडेलचा 'सोशल' छळ

https://ift.tt/2XF7yjL
म. टा. खास प्रतिनिधी, पोलिस दलामध्ये एसीपी असल्याचे भासवून मॉडेलचा सोशल छळ करणाऱ्या भामट्याविरुद्ध डी.एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत असे त्याचे नाव असून तो समाजमाध्यमांवरून तरुणींचे फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल करीत होता. मॉडेलप्रमाणे इतर तरुणींनाही या तोतया एसीपीने धमकावल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अंधेरीमधील एका मॉडेलला व्हॉटसअॅपवर तिचाच एक फोटो अनोळखी व्यक्तीने पाठवला. एसीपी असल्याची ओळख दाखवून या व्यक्तीने मॉडेलला भेटण्यास सांगितले. ओळख नसताना भेटायला येण्यास मॉडेलने नकार दिला. यावर खोट्या प्रकरणामध्ये अडकवेन आणि करियर करू देणार नाही अशी धमकी त्याने दिली. पोलिसाकडून अशी धमकी मिळत असल्याने मॉडेल घाबरली. हा अधिकारी काही करण्याआधीच तिने डी.एन. नगर पोलिस ठाणे गाठले आणि याबाबत तक्रार केली. मॉडेलला धमकावणारा तोतया पोलिस असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, मोबाइल क्रमांक, समाजमाध्यम तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याचा शोध घेतला जात आहे.