मुंबईः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारने लसीकरण मोहिमेवर अधिक जोर दिला आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळं लसीकरण मोहिम धीम्यागतीने सुरू आहे. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून धुमधडाक्यात गणारायाचे आगमन () झालं आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद असणार आहेत. () महानगरपालिका आणि सरकारी केंद्रांवर शुक्रवारी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. विशेष लसीकरण मोहिमांच्या नियोजनासह प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करता यावी म्हणून मुंबईतील लसीकरण केंद्रे आज बंद राहणार आहेत. मात्र, शनिवारी ११ सप्टेंबर रोजी लसीकरण पुन्हा पूर्ववत सुरू आहेत. महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र, तांत्रिक बाबींमुळं लसीकरण केंद्र आज बंद असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. वाचाः करोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देऊन अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबवण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे त्यांच्या घरी जावून लसीकरण, एलजीबीटी समुदायातील नागरिकांचे विशेष लसीकरण केंद्र व फक्त महिलांसाठी विशेष कोव्हिड लसीकरण सत्र राबवण्याचे देखील विचाराधीन आहे, असं पालिकेनं म्हटलं आहे. तसंच, येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येतंय. त्यासाठी सरकारी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणं आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे. वाचाः