Maharashtra Mumbai Lakes : मुंबईचे ७ मोठे तलाव ९० टक्के भरले, पण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 7, 2021

Maharashtra Mumbai Lakes : मुंबईचे ७ मोठे तलाव ९० टक्के भरले, पण...

https://ift.tt/3yTdq5g
मुंबई : राज्यात मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुंबईत झालेल्या पावसामुळे राज्यातील तलावांमधील पाण्यात ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, पण तरीही ती गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचं समोर आलं आहे. मात्र, येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तलावांची पातळी सुधारू शकते, अशी अपेक्षा आहे. (Maharashtra's are 90 percent filled with water in 2021) पुढील पावसाळ्यापर्यंत अखंड पाणी पुरवठ्यासाठी सप्टेंबरअखेर तलाव शंभर टक्के भरले पाहिजेत. खरंतर, मुंबईचे सात मोठे तलाव - तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मिडलर वैतरणा, मोडक सागर, तुळशी आणि विहार यांची एकत्रित साठवण क्षमता १४.४७ लाख दशलक्ष लिटर आहे. सोमवारपर्यंत, तलावांमध्ये १३.३५ लाख मिली पाणी होतं. जे त्याच्या एकूण क्षमतेच्या ९२ टक्के आहे. जुलैच्या मध्यापर्यंत, तलावांमध्ये पाणी साठा १८ टक्क्यांपेक्षा कमी होता. जुलैच्या अखेरीस मुसळधार पावसामुळे साठ्यात मोठी वाढ झाली. पण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यामुळे पाणीसाठा वाढू शकला नाही. या आठवड्यात पाऊस पडल्याने अखेर पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु हा स्टॉक मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही कमी आहे. २०२० मध्ये तलावांमध्ये १४.१६ लाख मिली पाणी (९७.९%) आणि ६ सप्टेंबर २०१९ मध्ये १४.२ लाख मिली पाणी (९८.१ टक्के) होते. जर सप्टेंबरच्या अखेरीस सर्व तलावांची पाणी पातळी १०० % भरली असेल तर पुढील १० महिने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीसाठा पुरेसा आहे. हायड्रॉलिक विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'पूर्ण महिना शिल्लक आहे आणि आयएमडीने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत' असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. ६ सप्टेंबर रोजी पाणी साठा (लाख मिलीमध्ये) २०२१ - १३.३५ - ९२.२ टक्के २०२० - १४.१६ - ९७.९ टक्के २०१९ - १४.२ - ९८.१ टक्के (Maharashtra's Mumbai water lakes are 90 percent filled with water in 2021)