आजारी सचिन वाझेचा NIA कोर्टात अर्ज; केली 'ही' मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 9, 2021

आजारी सचिन वाझेचा NIA कोर्टात अर्ज; केली 'ही' मागणी

https://ift.tt/2YGw8kk
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई न्यायालयाच्या परवानगीनंतर हृदयविकारावरील उपचारांसाठी भिवंडीतील रुग्णालयात दाखल झालेला बडतर्फ पोलिस अधिकारी याने आता शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची परवानगी मागितली आहे. वाझेने मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर आज, गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अँटिलिया विस्फोटके व मनसुख हिरन हत्या प्रकरणात वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी हृदयविकाराविषयी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, असे सांगत त्याने पूर्वी खासगी रुग्णालयात उपचार घेऊ देण्याची विनंती न्यायालयाला अर्जाद्वारे केली होती. तुरुंगात प्रकृती खालावल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आणि प्रकृतीच्या कारणाखाली केलेला जामीन अर्ज प्रलंबित असतानाच उपचारादरम्यान दगावलेले स्टॅन स्वामी यांच्यासारखे आपले होऊ नये, असे म्हणणेही वाझेने त्याविषयीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात मांडले होते. वाचा: न्यायालयाने ३० ऑगस्ट रोजी वाझेचा अर्ज मान्य करून त्याला त्याच्या निवडीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा दिली. त्याप्रमाणे त्याला ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. आता पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची विनंती त्याने अर्जाद्वारे केली आहे. वाचा: