परमबीर सिंह यांना लवकरच फरार घोषित करणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 26, 2021

परमबीर सिंह यांना लवकरच फरार घोषित करणार?

https://ift.tt/3pD5Ydy
: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांना लवकरच राज्य सरकार फरार घोषित करणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली असून, लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे कळते. यासाठी राज्याच्या गृह विभागाने केंद्रीय गुप्तचर विभागाला (आयबी) पत्रव्यवहार केल्याची माहिती हाती आली असून, या पत्रात परमबीर देशाबाहेर गेल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारतर्फे निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकवेळा समन्स पाठविले. मात्र ते समितीसमोर हजर झाले नाहीत. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. गृह विभागाच्या सूत्रांनुसार परमबीर यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. समन्सनंतरही ते चांदीवाल समितीसमोर हजर न झाल्याने गृह विभागाकडून त्यांना फरार घोषित करण्याची कार्यवाही होणार असल्याचे कळते. वाचाः