सिंघू सीमेवरील हत्येची जबाबदारी निहंग सरबजीत सिंगने स्वीकराली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

सिंघू सीमेवरील हत्येची जबाबदारी निहंग सरबजीत सिंगने स्वीकराली

https://ift.tt/3j90kf8
नवी दिल्लीः सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी निहंग सरबजीत सिंगने हत्येची जबाबदारी स्वीकारत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. ही हत्या आपणच केल्याचा दावा सरबजीत सिंगने पोलिसांसमोर केला. हात कापल्याची आणि हत्येची करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. आता सरबजीतच्या चौकशी केली जाईल. घटनेवेळी त्याच्यासोबत कोण-कोण उपस्थित होतं, याचा तपास केला जाईल. हत्या किती क्रूरपणे हत्या केली गेली, यासाठी पोलीस सर्व व्हिडीओ तपासत आहेत. तपासात आणखी जणांचीही चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. हत्येत जो कोणी सामील असल्याचं आढळेल त्याला अटकही केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. सिंघू सीमेवरील घटनेसंबंधी चंदिगड येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली. दोषींना सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर बैठकीत म्हणाले. गृहमंत्री अनिल विज आणि पोलीस महासंचालकांसह इतर उच्च अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. बैठकीत घटनेची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कठोर आणि निष्पक्ष कारवाईचे आदेश दिले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सिंघू सीमेवरील हत्येप्रकरणी आतापर्यंत दोन नावं समोर आली आहेत. सिंघू सीमेवर पोलिसांच्या बॅरिकेडला बांधलेला एक मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला. मृत व्यक्तीचा एक हात कापण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शिखांच्या धार्मिक पवित्र पुस्तकाचा अपमान करताना पकडली गेला. त्यानंतर निहंगांनी त्याची हत्या केली, असा आरोप आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव लखबीर सिंग (वय ३५) असं असून तरणतारण जिल्ह्यातील चीमा गावातील तो मजूर होता. तो अनुसूचित जातीचा होता, अशी माहिती हरयाणा पोलिसांनी दिली.