
परभणी: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री हे सातत्याने आरोपांच्या फैरी झाडत आहेत. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक हे भाजपसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करून वसुली करतात असा आरोप करताना अभिनेता याचा मुलगा याच्यावर करण्यात आलेली कारवाई बोगस असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. त्याचवेळी वानखेडे यांच्यावर वैयक्तिक आरोपही मलिक यांनी केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी मलिक यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. ( ) वाचा: 'गेल्या पंधरा दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांना शाहरुख खान याचा मुलगा सोडला तर राज्यातील दुसरा कोणताच प्रश्न दिसत नाही. बहुदा सरकार जाण्याची चाहुल त्यांना लागली असेल. त्यातूनच बेरोजगार होण्याच्या भीतीने त्यांनी वकिली सुरू केली असावी आणि शाहरुख खानच्या मुलाचं पहिलं वकीलपत्र त्यांना मिळालं असावं असं मला वाटतंय', असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. वाचा: देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही, असा प्लान होता. यांची जिरवायची हे नितीन गडकरी आणि आमचं आधीच ठरलं होतं, असा दावा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचा इन्कार करताना हे बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही वडेट्टीवारांच्या विधानाचा समाचार घेतला. 'महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे डोके तपासावे लागेल असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. नितीन गडकरी हे आमचे पालक आहेत. ते आमची काळजी करतात. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या म्हणण्यात जराही तथ्य नाही. ते साफ खोटं बोलत आहेत, असे पाटील म्हणाले. शिवसेनेसोबत येणाऱ्या दिवसात युती होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. येत्या काळात आम्ही आमचा पक्ष आणखी वाढवणार, असे ते म्हणाले. पाटील परभणी दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते. वाचा: