लवकरच 'स्पेशल २६' रिलीज करतोय; मलिक कोणता गौप्यस्फोट करणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 26, 2021

लवकरच 'स्पेशल २६' रिलीज करतोय; मलिक कोणता गौप्यस्फोट करणार?

https://ift.tt/3EkSVSn
मुंबईः आर्यन खान (aryan Khan) प्रकरणात पंचनाम्यावर स्वाक्षरी केलेले पहिले साक्षीदार प्रभाकर साईल (prabhakar sail) यांनी रविवारी (sameer wankhede) यांच्यावर लाचखोरीचा आरोप केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Nawab Malik) यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण लावून धरले होते. त्यात नवाब मलिकांनी या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. अशातच नवाब मलिक यांनी सकाळीच आणखी एक ट्वीट केलं आहे. आर्यन खानप्रकरणी पंच प्रभाकर साईल याच्या गौप्यस्फोटानंतर प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मुख्यत्वे साईलच्या आरोपानंतर मलिक ट्विटरवरून वानखेडे यांना जोरदारपणे लक्ष्य करत आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद, तर आईचे नाव झहिदा आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली', असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी सोमवारी केला होता. तसंच, ट्विटरवर समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाच पोस्ट केला होता. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे हे आरोप फेटाळले आहेत. मात्र, नवाब मलिकांनी आज सकाळीच आणखी ट्वीट करत या प्रकरणात मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या ट्विटमुळं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. वाचाः नवाब मलिकांनी फक्त दोन ओळींचे ट्वीट केलं आहे. स्पेशल २६ अशा आशयाचं ट्वीट करत त्यांनी आपण लवकरच रिलीज करतोय, असंही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे. आता या प्रकरणात नवाब मलिक कोणते नवीन गौप्यस्फोट करणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवलं असून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. वाचाः दरम्यान, नवाब मलिकांनी जन्म दाखल्यावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडेंनी हे आरोप फेटाळले होते. त्यावर नबाव मलिकांनीही पुन्हा वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. त्यांनी ट्वीटरवर एक फोटो पोस्ट करत हे वानखेडे दाऊद कोण आहेत?, असा सवाल केला आहे.