अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार, युतीसाठी भाजपसमोर ठेवली अट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

अमरिंदर सिंग नवीन पक्ष स्थापन करणार, युतीसाठी भाजपसमोर ठेवली अट

https://ift.tt/3G1jGgk
चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन लवकरच आपल्या नवीन पक्षाची ( ) घोषणा करणार आहेत. अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याच्या अटीवर पुढील वर्षी होणाऱ्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करू, असंही कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले आहेत. पंजाबच्या भविष्यासाठी लढा सुरू आहे. लवकरच नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार आहोत. पंजाब आणि पंजाबचे शेतकरी जे एक वर्षापासून अस्तित्वासाठी लढा देत आहेत त्यांच्या हितांसाठी सेवा देण्यासाठी हा राजकीय पक्ष काम करेल, असं रवीन ठुकराल यांनी ट्विट केलं आहे. शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचे हित बघून तोडगा काढला गेल्यास २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आपला पक्ष जागा वाटप करू शकेल. तसंच समविचारी पक्ष जे अकाली दलापासून वेगळे झाले आहेत, त्यांच्याशीही युती अपेक्षित आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. जोपर्यंत आपली माणसं आणि आपल्या राज्याचे भविष्य सुरक्षित करत नाही, तोपर्यंत विश्रांती घेणार नाही. पंजाबला अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून राजकीय स्थिरता आणि सुरक्षिततेची गरज आहे. पंजाबमधील जनतेला शांतता आणि सुरक्षा देण्यासासाठी जे काही करता येईल ते करेन. जे आज धोक्यात आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.