धक्कादायक! तब्बल १ टन काचा अंगावर पडल्या; टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

धक्कादायक! तब्बल १ टन काचा अंगावर पडल्या; टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

https://ift.tt/3DTJr03
: काचेच्या कारखान्यातील काचा टेम्पोत भरताना मोठी घडली आहे. क्रेनचा बेल्ट तुटल्याने काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप खरुसे याने पाच महिन्यांपूर्वी नवीन टेम्पो घेतला होता. त्याद्वारे तो मालवाहतुकीचे काम करत होता. सकाळी औद्योगिक वसाहत येथील एका कारखान्यात काचा टेम्पोत भरत असताना क्रेनचा बेल्ट तुटला. खाली उभा असलेल्या खरुसे याच्या अंगावर एक टन वजनाच्या काचा पडल्या. काचा फोडून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर कारखानदारांवर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याबाबत कारखानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.