
जळगाव: 'आपली आमदारकीची सहावी टर्म असून, आता यापुढे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर आम्हाला एखाद्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्या', अशी मिश्कील मागणी नेते आमदार यंनी एका चित्रपट निर्मात्याकडे केली आहे. येथे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत 'हलगट' या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी महाजन यांनी केलेल्या विधानाने सगळेच चकीत झाले. या विधानावर बरीच चर्चाही रंगली आहे. ( ) वाचा: गिरीश महाजन म्हणाले की, , , जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीची सहावी टर्म आहे. सलग तीस वर्षे आमदारकी भूषवल्याने पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे यापुढे जर पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला निवृत्तीच घ्यावी लागेल. मग अशावेळी काय करायचे? हा प्रश्न उरेल. त्यामुळे भविष्यात आम्हालाही आपल्या चित्रपटात एखादी भूमिका करण्याची संधी द्या, अशी मागणीच गिरीश महाजन यांनी हलगट चित्रपटाच्या निर्मात्याकडे केली. वाचा: ...तर तुमच्यासाठी इंगजी चित्रपट काढू गिरीश महाजन यांनी चित्रपटात भूमिका देण्याची मागणी केल्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही महाजन यांच्या या मिश्कील मागणीचा धागा पकडत, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असे सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. वाचा: