'डब्बा ट्रेडिंग'चा पर्दाफाश; 'या' शहरात ३ ठिकाणी छापे, १३ जणांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 17, 2021

'डब्बा ट्रेडिंग'चा पर्दाफाश; 'या' शहरात ३ ठिकाणी छापे, १३ जणांना अटक

https://ift.tt/2XmM0rW
पिंपरी: ऑनलाइन अ‍ॅपच्या साहाय्याने शेअर मार्केटमधील निर्देशांकाच्या चढउताराचा बेकायदेशीर वापर करत ' डब्बा ट्रेडिंग ' करणाऱ्या मधील तीन ठिकाणांवर दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत तेरा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये आणि १५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ( ) वाचा: (वय ५१, रा. वाघेरे पार्क, पिंपरी), प्रकाश पासमल मनसुखानी (वय ५२, रा. शास्त्रीनगर, पिंपरी), रवी अच्युत गायकवाड (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी), विकी सुरेश कांबळे (वय ३६, रा. बलदेवनगर, पिंपरी), रोशन सुरेश मखिजा (वय २९, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी), सतिश दत्तात्रय खेडकर (वय ३५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), राहुल मारुती कांबळे (वय ४८, रा. शास्त्रीनगर, पिंपरी), रितेश अरुण गायकवाड (वय ३२, रा. घोरपडी स्टेशन रोड, शनिवार पेठ, पुणे), राजकुमार आवतराम कुंदनानी (वय ४५ रा. शगुन चौक, पिंपरी), गोविंद मोहनदास नथवानी (वय ५२, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी), हरेश सेवकराम सचदेव (वय ३१, रा. साईनाथ सोसायटी, पिंपरी), जितू सुरेश मखिजा (वय ३१, रा. पिंपरी) आणि जितू शंकर वलेचा (वय २४, रा. लक्ष्मीधर्म शाळेजवळ, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाचा: या सर्वांवर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. शेअर मार्केटमध्ये 'डब्बा ट्रेडिंग' हा अवैध ट्रेडिंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याबाबत पोलीस आयुक्त यांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी दरोडा विरोधी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पथक तयार करण्यात आले. पिंपरीतील अ‍ॅपल बिल्डर अ‍ॅंण्ड डेव्हलपर्स, अशोक थीएटरजवळील शेअरखान आणि गॅलड चौकातील बालाजी इनव्हेस्टमेंट या कार्यालयांवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत एक लाख २० हजारांची रोकड आणि १५ मोबाइल जप्त करण्यात आले. आरोपींनी ऑनलाइन अ‍ॅपच्या सहाय्याने मधील निर्देशांकाच्या चढउताराचा विनापरवाना वापर केला. त्याआधारे बेकायदेशीरपणे ट्रेडिंग केले. त्यासाठी कोणत्याही 'डी मॅट' अकाऊंटचा वापर केला नाही. स्वत:ची ओळख लपवून त्याबाबत 'सेबी'ला कोणतीही नोंदणी न करता कर चुकवेगिरी करत सरकारची फसवणूक केली, असे उघड झाले आहे. वाचा: