
मुंबई: 'मी मुख्यमंत्री आहे, असं मला कधीही वाटू नये. मी घरातील कुणीतरी आहे. तुमचा भाऊ आहे, असं जनतेला वाटावं, अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे,' असे सांगतानाच 'मी पुन्हा येईन असं जे बोलत होते त्यांना आजही मी गेलोच नाही असं वाटत आहे. मग बस तिकडेच... हे असले संस्कार आम्हाला कुणी शिकवले नाहीत. पद, सत्ता काय असते? ती येईल आणि जाईल पण मी कुणीतरी आहे, हा अहमपणा डोक्यात जाऊ द्यायचा नसतो. ज्या क्षणी तुझ्या डोक्यात हवा गेली त्या क्षणी तू संपलास, ही आम्हाला आमच्या वडिलधाऱ्यांची शिकवण आहे आणि त्याचच पालन मी करत आहे. सगळ्यांशी नम्रपणे वागत आहे', असे नमूद करत मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांनी दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते यांचा खरपूस समाचार घेतला. ( ) वाचा: शिवसेना आणि युती तुटल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्यानंतर या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं. या घटनाक्रमावर उद्धव यांनी महत्त्वाचं भाष्य केलं. 'शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्व हा समान धागा होता. त्यामुळेच आमची युती झाली होती. जर शिवसेनेला दिलेले वचन भाजपने मोडले नसते तर कदाचित तुम्ही (देवेंद्र फडणवीस) आज पुन्हा मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या ते नशीबात नव्हतं', असं नमूद करत उद्धव ठाकरे यांनी मोठं राजकीय विधान केलं. 'मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो. कारण माझे हे क्षेत्रच नाही. केवळ मुलाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या क्षेत्रात आलो आणि जी परिस्थिती येत गेली त्याला सामोरा जात गेलो आणि आज पाय रोवून भक्कमपणे उभा आहे. एका निश्चयाने मी पुढे जात आहे, असे ठाकरे म्हणाले. वाचा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात आज सरसंघचालक यांचे भाषण झाले. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी फटकेबाजी केली. आज दोन मेळावे झाले. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला आणि आता आपला होत आहे. हिंदुत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदुत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करून तुमच्यावर टीका करतोय असे मानू नका पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसे ऐकणार नसतील तर हे मेळावे करायचे तरी कशासाठी?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आलेत का?, असे विचारतानाच लखीमपूर खेरीच्या घटनेवर उद्धव ठाकरे यांनी चीड व्यक्त केली. सत्तेसाठी संघर्ष असता नये. म्हणून तुम्ही तुमच्या लोकांची शिकवणी लावा, असा सल्लाच ठाकरे यांनी भागवतांना दिला. मैं तो फकीर हूं, झोली पहनके, ये झोलीबीली असे आमचे कर्मदरिद्री विचार नाहीत, असा कुणाचेही नाव न घेता टोलाही ठाकरे यांनी लगावला. राज्याच्या कारभारात केंद्राची लुडबूड नको देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. गेल्या ७५ वर्षांत देशात काय केले, नुसती रोषणाई करायची का? याबाबतीत उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले. आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राकडे आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. राज्याच्या रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्यं बरबाद करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजेत, असे नमूद करत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. वाचा: