चेन्नई सुपर किंग्ज IPL 2021चे विजेते; मुंबई इंडियन्सच्या विक्रमापासून एक पाऊल दूर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

चेन्नई सुपर किंग्ज IPL 2021चे विजेते; मुंबई इंडियन्सच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

https://ift.tt/3j6cfdS
दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथे विजेतेपद मिळवले. गेल्या हंगामात ज्या संघाला साखळी फेरीत गारद होण्याची वेळ आली होती त्यांनी या हंगामात सर्वात आधी प्लेऑफचे तिकिट मिळवले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून फायनलमध्ये स्थान मिळवले. जगातील सर्वात श्रीमंत आयपीएल टी-२० लीगला २००८ साली सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद मिळवले. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे स्पर्धेवर वचर्स्व राहिले. त्यांनी २०१० आणि २०११ अशी सलग दोन विजतेपद मिळवली. तर २०१२ ला ते पुन्हा फायनलमध्ये पोहोचले. पण केकेआरकडून त्यांचा पराभव झाला. २०१३ पासून मुंबई इंडियन्से बाजी मारण्यास सुरूवात केली. मुंबईचे हे पहिले विजेतेपद ठरले. त्यानंतर आतापर्यंत तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. त्यांनी पाच विजेतेपद पटकावली आहेत. तर चेन्नई सुपर किंग्जने ३ विजेतेपद मिळवली आहेत. केकेआरने २ वेळा बाजी मारली आहे. आयपीएलचे आतापर्यंतचे विजेते २००८- राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ३ विकेटनी पराभव केला २००९- डेक्कन चार्जर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ धावांनी पराभव केला २०१०- चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा २२ धावांनी पराभव केला. २०११- चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ५६ धावांनी पराभव केला २०१२- कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ विकेटनी पराभव केला २०१३- मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा २३ धावांनी पराभव केला २०१४- कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्जचा ३ विकेटनी पराभव केला २०१५- मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ४१ धावांनी पराभव केला २०१६- सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ८ धावांनी पराभव केला २०१७- मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा १ धावांनी पराभव केला २०१८- चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटनी पराभव केला २०१९- मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा १ धावांनी पराभव केला २०२०- मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ विकेटनी पराभव केला. २०२१- चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.