भयंकर! काइली जेनरने शेअर केले न्यूड फोटो,पाहून तुम्हालाही येईल किळस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 13, 2021

भयंकर! काइली जेनरने शेअर केले न्यूड फोटो,पाहून तुम्हालाही येईल किळस

https://ift.tt/3ALnHBL
मुंबई- लोकप्रिय हॉलिवूड मॉडेल आणि बिसनेसमन तिच्या हटके फोटोंसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. काइली अनेकदा निरनिराळ्या स्टाइलचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. काइलीचे फोटो पाहून चाहतेही घायाळ होतात. तिच्या पोस्टला नेटकरी भरभरून प्रतिसाद देतात. परंतु, काइलीने नुकतेच शेअर केलेले फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले नाहीत. या फोटोंवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. काइलीने शेअर केलेले फोटो पाहून नेटकऱ्यांना जणू किळस आला आहे. काइलीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही न्यूड फोटो शेअर केले. परंतु, नेटकऱ्यांना तिचे हे न्यूड फोटो फारसे आवडलेले नाहीत. कारण या फोटोंमध्ये काइली रक्तात माखल्याप्रमाणे दिसत आहे. काइलीच्या अंगावर गडद लाल काहीतरी पडलेलं आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यावर काइलीच्या अंगावर रक्त असल्याचा भास होतोय परंतु, ते रक्त नसून लाल रंग आहे. काइलीचे हे फोटो प्रचंड बीभत्स दिसत असून ते पाहायलादेखील भयानक आहेत. काइली एका हॉरर फ्रॅन्चायजी सोबत काम करत असल्याने तिने हे फोटोशूट केले आहेत. त्यासोबतच एका सौंदर्य प्रसाधन कंपनीची जाहिरात करण्यासाठी काइलीने हे फोटोशूट केलं आहे. यासोबतच काइलीने एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. काइलीचे हे फोटो पाहून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. युझर्स काइलीला तिच्या बाळाबद्दल विचारत आहेत. एका युझरने लिहिलं, 'हे फोटो खूप वाईट आहेत पाहण्यासारखे तर मुळीच नाहीयेत मुखतः तेव्हा जेव्हा तुम्ही गर्भवती असता.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'तू एकदम हडळीसारखी दिसतेयस.' काइलीचे हे फोटो अत्यंत भयंकर असून नेटकरी तिच्यावर नाराज असल्याचं दिसतंय.