
पिंपरी: ' येथे घडलेल्या घटनेतून कळले की तेथील काही लोकांच्या डोक्यात सत्तेची गुर्मी आहे. ज्यांच्या गाडीखाली चिरडून लोकांचा मृत्यू झाला त्यांचे वडील अजय मिश्रा केंद्रीय राज्यमंत्री आहेत. एवढी गंभीर गोष्ट घडल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, सत्तेचा दर्प एवढा आहे की आम्ही सत्तेत असल्याने वाटेल ते करू, आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद यातून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हे आज ते दाखवतील पण देशातील जनता योग्यवेळी याचे उत्तर देईल', असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष यांनी दिला आहे. ( ) वाचा: पिंपरी चिंचवड येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी लखीमपूर खीरी हिंसाचार व शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला. 'देशातील शेतकऱ्यांचे १० महिने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी मी स्वतः जाऊन आलो. आंदोलनामध्ये जे घटक सहभागी आहेत त्यांच्याबाबत केंद्र सरकारची सामंजस्याची भूमिका दिसत नाही, असे मला वाटते. आंदोलनात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. आमचं केंद्र सरकारला सांगणं आहे की, पंजाबमधल्या शेतकऱ्याला अस्वस्थ होऊ देऊ नका. हे सीमेवरील राज्य आहे. सीमेवरील राज्यातील लोकांना अस्वस्थ केले तर त्याचे दुष्परिणाम देशावर होतात', अशा शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारला सावध केले. वाचा: यांना नाहक त्रास दिला जातोय केंद्रीय तास यंत्रणांकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. राज्यातील अनेक नेते सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यारून पवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. 'भाजपाचे जुने नेते एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर खटले सुरू झाले. अनेक वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीने पक्ष सोडल्यावर त्याला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री हे राज्यात एखादी गोष्ट बोलल्यानंतर त्यावर केंद्रीय यंत्रणा लगेचच कारवाईला सुरुवात करते. हा नवीनच प्रकार पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा', असे पवार म्हणाले. वाचा: