प्रवासी टॅक्सीतून मध्येच उतरले; संतापलेल्या टॅक्सीचालकानं केलं धक्कादायक कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 13, 2021

प्रवासी टॅक्सीतून मध्येच उतरले; संतापलेल्या टॅक्सीचालकानं केलं धक्कादायक कृत्य

https://ift.tt/3FEOMtL
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई जास्त भाड्याची मागणी आणि बंद असलेला एसी या कारणामुळे प्रवासी टॅक्सीतून मध्येच उतरल्यामुळे संतापलेल्या टॅक्सीचालकाने महिलेला बदनाम करण्यासाठी तिचा मोबाइल क्रमांक वेगवेगळी संकेतस्थळे आणि अश्लील व्हॉटसॲप ग्रुपवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे महिलेची बदनामी झाली आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी ॲप-आधारित टॅक्सी चालविणाऱ्या या चालकाला अटक केली. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या परिचयातील टॅक्सीचालकाला फोन केला. पतीला आणि सासऱ्यांना एका मीटिंगसाठी बोरिवलीला जायचे असल्याने तिने या चालकाची टॅक्सी बुक केली. टॅक्सीचालक त्यांना घरी घेण्यासाठी आला. पती आणि सासरे टॅक्सीतून निघाल्यानंतर, एसी बंद असल्याच्या कारणावरून त्यांचा या टॅक्सीचालकाशी वाद झाला. याचवेळी घरी नेण्यासाठी परतीचे भाडेही द्यावे लागेल, अशी मागणी टॅक्सीचालकाने केल्याने वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे टॅक्सी अर्ध्या वाटेत सोडून या महिलेचे पती आणि सासरे कांदिवली येथे टॅक्सीतून उतरले. पुढे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. या घटनेनंतर काही दिवसांनी या महिलेला देशातून तसेच परदेशातून अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले. अनेकजण या महिलेसोबत अश्लील बोलू लागले. इतकेच नाही, तर अश्लील व्हिडीओ आणि फोटोही येत होते. नेमके काय घडतेय, हे कुणालाच कळत नव्हते. कुटुंब तसेच नातेवाईकांमध्येही बदनामी होऊ लागल्याने अखेर या महिलेने लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिहारमधून अटक याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक निकम, मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद पवार यांच्यासह माळगावकर, काठे, शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. टॅक्सीचालकासोबत घडलेला प्रकार आणि तांत्रिक पुरावे या आधारे बिहार येथून उत्सवकुमार शुक्ला याला अटक केली. परिचित असल्याने उत्सवकुमार याच्याकडे महिलेचा मोबाइल क्रमांक होता. अर्धवट भाडे सोडून टॅक्सीतून उतरल्यामुळे राग आला आणि धडा शिविण्यासाठी त्याने हे कृत्य केले, असे त्याने पोलिसांना सांगितले.