श्री. एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची सुरुवात अत्यंत दुर्गम अशा मोखाडा तालुक्यातील खोडाळा, पोशेरा त्यानंतर विक्रमगड येथील आलोंडे, डहाणू येथील वणई तर बोईसर मधील नवापूर डोंगरी प्रदेश अशी ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याला विकासाशी जोडण्यासाठी शिवसेना नक्की सर्वतोपरी प्रयत्न करेल असे स्पष्ट करताना खावटी कर्ज हे अनुदान स्वरूपात सुरू करून आदिवासी बांधवांना दिलासा देण्याचे काम केल्याचे सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करण्यासाठी उत्तम रस्ते, दुर्गम भागात पाणी पुरवठा, अखंडित वीज पुरवठा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत आश्वस्त केले.
