
दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात पंचाकडून एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले आणि त्याला फटका भारतीय संघाला या सामन्यात बसला. पंचांनी हा निर्णय जर योग्य दिला असता तर भारतीय संघ हा सामना जिंकूही शकला असता. चांकडून नेमकी कोणती मोठी चुक घडली पाहा...भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सुरुवातच भन्नाट झाली. पहिल्याच षटकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने रोहित शर्माला बाद केले आणि तिथेच भारताला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून भारतीय संघ सारवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचवेळी लोकेश राहुलच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. आफ्रिदीनेच राहुलला क्लीन बोल्ड केले आणि भारताला दुसरा धक्का दिला. पण तिथेच पंचांनी मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल बोल्ड झाल्यावर थेट मैदानाबाहेर जाण्यासाठी निघाला. त्यावेळी पंचांनी हा चेंडू योग्य आहे की नाही, हे पाहायला हवं होतं. मैदानावरील पंचांच्या पहिल्यांदा ही गोष्ट निदर्शनास यायला हवी होती. पण मैदानातील पंचांना ही गोष्ट समजली नाही. नवीन नियमांनुसार तिसरे पंचही नो बॉलचा निर्णय देऊ शकतात. पण तिसऱ्या पंचांनाही यावेळी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. राहुल बाद झाल्यावर जेव्हा पुन्हा एकदा रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा मात्र शाहिन आफ्रिदीने टाकलेला चेंडू हा नो बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण तोपर्यंत उशिर झाला होता. पण पंचांच्या या चुकीचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण भारतीय संघाला राहुलसारखा फॉर्मात असलेला फलंदाज गमवावा लागला. त्याचबरोबर भारतीय संघाची लयही त्यावेळी बिघडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पंचांची एक चुक भारताला भरपूर महाग पडली. कारण राहुलसारखा खेळाडू एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो. त्यामुळे जर राहुलला त्यावेळी पंचांनी योग्य निर्णय देऊन नाबाद ठरवले असते तर कदाचित सामन्याचा निकालही बदलेला पाहायला मिळू शकला असता. पण भारताच्या नशिबातच हा पराभव असल्याचे म्हटले जात आहे.