आर्यन खान अटक प्रकरण : 'एनसीबी' विरोधात शिवसेना न्यायालयात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

आर्यन खान अटक प्रकरण : 'एनसीबी' विरोधात शिवसेना न्यायालयात

https://ift.tt/3n8nDXD
नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे मुंबई विभागीय कार्यालय आणि तेथील अधिकाऱ्यांची प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांचा उल्लंघन होत आहे, याची न्यायालयाने एनसीबीशी संबंधित घडामोडींची स्वाधिकारात (स्यू मोटो) दखल घ्यावी. त्याला बदहेतूने अटक करण्यात आली आहे. याच पद्धतीने चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटी आणि मॉडेल यांना लक्ष्य करून गेल्या दोन वर्षांत कारवाई करण्यात आली. यात एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी न्यायालयामार्फत करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी याचिकेद्वारे केली आहे. आर्यनचे समुपदेशन कधी केले? दरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानचे समुपदेशन कधी केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केली. एनसीबीने आर्यन खानचे समुपदेशन तुरुंगात केले का, अशी विचारणा करून हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे देशातील ख्यातनाम वकील हरीश साळवे बोलत आहेत. त्यामुळेच संबंधित यंत्रणेकडून आता अशा सकारात्मक गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. यावेळी, 'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली हे ठीक आहे. त्यांची जीभ घसरली होती, आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी' असा टोला मलिक यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.