पुणेकरांसाठी मोठी बातमी; 'लोहगाव' विमानतळ १५ दिवस बंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 17, 2021

पुणेकरांसाठी मोठी बातमी; 'लोहगाव' विमानतळ १५ दिवस बंद

https://ift.tt/2YUT2oH
म. टा. प्रतिनिधी, पुणेः लोहगाव विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी प्रवासी उड्डाणे शनिवारी सकाळी आठ वाजतापासून बंद करण्यात आली असून, आता ३० ऑक्टोबरला विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवासासाठी मुंबई विमानतळ किंवा रेल्वे प्रवासावर अवलंबून राहावे लागणार आहे. हवाई दलाकडून सप्टेंबर २०२० मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा २६ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाला होता. तेव्हापासूनच लोहगाव विमानतळावरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. साधारण वर्षभर लोहगाव विमावतळावरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता चौदा दिवसांसाठी विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग बंद राहणार आहेत. हवाई दलाच्या निर्णयानुसार शनिवारी १६ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजल्यापासून ते शनिवारी ३० ऑक्टोबरला सकाळी आठ वाजेपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.