पवार- ठाकरेंच्या बैठकीत 'छापेमारी'विरुद्ध डावपेच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

पवार- ठाकरेंच्या बैठकीत 'छापेमारी'विरुद्ध डावपेच

https://ift.tt/30EhU4t
म. टा. विशेष प्रतिनिधी, : वाहतूकदारांच्या समस्या, लॉकडाउनमधील शिथिलता आणि चित्रपटगृहांच्या प्रश्नांबाबत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि यांच्यात बैठक झाली. त्यानंतर या बैठकीत केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या ''ला निग्रहाने लढा देण्यासाठी उभय नेत्यांमध्ये डावपेच आखण्यातही चर्चा झाल्याचे समजते. केंद्राच्या तपास यंत्रणांचा राज्यातील वाढत्या हस्तक्षेपाचा निकराने मुकाबला करायला हवा, असे मत शरद पवारांनी यावेळी मांडल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सीबीआय, आयटी, इडीमार्फत छापे टाकले जात आहेत. तर काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित व्यक्तींवरही छापे टाकले जात आहेत. शरद पवार यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरत त्यांच्यावर नुकताच हल्ला चढवला होता. केंद्र सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असून, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. केंद्राने राज्यातील सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तपास यंत्रणांच्या छापेमारीवर कठोर शब्दांत टीका केली होती. दसरा मेळाव्याच्या भाषणाचे कौतुक? यासर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेबारा वाजता ही बैठक पार पडली. केंद्र सरकार असो वा त्यांच्या अख्यत्यारीतील तपास यंत्रणा या दोन्हींचा महाविकास आघाडी सरकार म्हणून निग्रहाने मुकाबला करायला हवा, असा सल्ला पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याचे कळते. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातही प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भाजपवर कडाकडून टीका केली होती. त्याचाही उल्लेख करीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्याचे समजते.