नागपूर हादरले! पॉर्न व्हिडिओ बघून ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

नागपूर हादरले! पॉर्न व्हिडिओ बघून ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

https://ift.tt/2Z75HF0
म.टा. प्रतिनिधी, मोबाइलमध्ये पॉर्न बघून १४वर्षीय मुलाने चारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना नवीन कामठी भागात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलगा नववीत शिकतो. त्याचे वडील रेल्वेत कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी मुलगा व त्याची सहावर्षीय बहीण घरी होती. त्याने बहिणीला चारवर्षीय मुलीला खेळायला घरी बोलावण्यास सांगितले. त्याची बहीण मुलीला घेऊन घरी आली. मुलाने बहिणीला टीव्ही लावून दिला. तिला कार्टून बघायला सांगितले. त्यानंतर तो चारवर्षीय मुलीला घेऊन आतील खोलीत गेला. मोबाइलमध्ये पॉर्न बघून मुलीवर अत्याचार केला. मुलगी रडायला लागली. ती घरी आली. तिच्या आईने विचारणा केली. तिला संशय आला. ती मुलाच्या घरी गेली. घडलेला प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. ती मुलीला घेऊन नवीन कामठी पोलिस स्टेशनमध्ये गेली व तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाला ताब्यात घेतले. मोबाइलमध्ये पॉर्न बघून त्याने अत्याचार केल्याचा संशय असून याबाबत तपास सुरू असल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांनी दिली.