चढले तेज हळदीचे ! सुयश टिळक आणि आयुषीचा हळदी रंगला समारंभ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

चढले तेज हळदीचे ! सुयश टिळक आणि आयुषीचा हळदी रंगला समारंभ

https://ift.tt/3vr750Q
मुंबई : आणि त्याची भावी पत्नी या दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. आयुषी आणि सुयशला हळद लावलेल्या फोटोंमध्ये छान दिसत आहेत. या दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो पाहून त्या दोघांच्याही चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. सुयशचा आयुषीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. आयुषी आणि सुयशने सोशल मीडियावरून त्यांचा साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. साखरपुड्यानंतर त्यांच्या केळवणाचे फोटो सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्या फोटोंवरून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र लग्न कधी याचा खुलासा या दोघांनीही केला नव्हता. आता मंगळवारी अचानक त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या आधीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. करोनामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सुयश आणि आयुषीचा हळदीचा कार्यक्रम मंगळवारी झाला आहे. सुयशने त्याच्या इन्स्टा स्टोरीला त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो ठेवले आहेत. त्यामध्ये काही जवळचे मित्र व घरातील कुटुंबीय दिसत आहे. आज हळद झाल्यामुळे २० किंवा २१ ऑक्टोबर रोजी आयुषीसोबत लग्नगाठ बांधेल अशी चर्चा आहे. कोण आहे आयुषी? आयुषी २०१८ सालची 'मटा श्रावणक्वीन'ची विजेती आहे. साखरपुडा झाल्यानंतर सुयशने त्यांचे फोटो शेअर केले होते. तेव्हा सुयश कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'मी स्वत:ला नशीबवान समजतो. तुझ्यासारखी जोडीदार मला लाभली'.