नागपूरमध्ये उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला; धडकी भरवणाऱ्या आवाजाने खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 20, 2021

नागपूरमध्ये उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला; धडकी भरवणाऱ्या आवाजाने खळबळ

https://ift.tt/3nqePgf
: उपराजधानीतील कळमना बाजार परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेल्या पुलाचा (Nagpur Bridge Collapse) गर्डर मंगळवारी कोसळला. यावेळी धडकी भरवणारा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. रिंग रोडवरील पारडी चौकातून कळमना मार्केटला जाणाऱ्या मार्गावर भरत नगरचौकातील महाकाळकर सभागृहाजवळ पुलाचं काम सुरू आहे. याच पुलाच्या पिलरपासून गर्डर वेगळे झाले आणि खाली कोसळले. नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रिट रोडवर हा भाग कोसळला. दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. कळमना पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेला गर्डर नऊ प्लेट्सचा असल्याचे समजते. पुलाचा सुमारे ३० मीटरचा भाग पडला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सभेसाठी स्थळ बघण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, रविनीश पांडेय, गुलशन मुनीयार हे या परिसरातूनच जात होते. त्यांना पारडी चौकात असतानाच जोरदार आवाज झाला. आधी त्यांना ट्रकचा टायर फुटला असावा, असं वाटलं. मात्र, लगेच लोकांची धावपळ दिसून येताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तसंच लोकांना बाजूला केले.