परमबीर सिंह यांचा पाय खोलात; खंडणीखोरांची पोलिसांकडून धरपकड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 22, 2021

परमबीर सिंह यांचा पाय खोलात; खंडणीखोरांची पोलिसांकडून धरपकड

https://ift.tt/3Gb3lW7
म. टा. खास प्रतिनिधी, तत्कालीन यांच्या वर खंडणीखोरीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्या अडचणी वाढत आहेत. परमबीर यांच्यासह इतर आरोपींवर गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने एका हवाला ऑपरेटरला अटक केली. अल्पेश पटेल असे या हवाला रॅकेट चालवणाऱ्याचे नाव असून या गुन्ह्यात धरपकड सुरू झाली आहे. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक विमल अग्रवाल हे बोहो आणि ओशिवरा येथे बीसीबी हा रेस्टॉरंट आणि बार भागीदारीमध्ये चालवतात. सचिन वाझे हे गुन्हे शाखेत त्यांच्या संपर्कात आले. वाझे यांच्या सांगण्यावरून अग्रवाल यांनी हॉटेल आणि बार व्यवसाय पुन्हा सुरू केला. रेस्टारंट आणि बार सुरू केल्यानंतर वाझे यांनी पैशाची मागणी केली. परमबीर सिंह यांनी दररोज दोन कोटींच्या वसुलीचे लक्ष्य दिले आहे, असे वाझे यांनी सांगितल्याचे नमूद करून अग्रवाल यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. बार चालवायचा असेल, तर पैसे द्यावे लागतील असे सांगून जानेवारी २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९ लाख रुपये रोख आणि सॅमसंग कंपनीचे दोन महागडे मोबाइल घेतल्याचा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला. त्यावरून पोलिसांनी परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यासह सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. खंडणीच्या या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याचा सहभाग निश्चित होताच पोलिसांनी त्याला अटक केली. पटेल याला गुजरातच्या मेहसाणा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. पटेल याच्या चौकशीतून बरीच माहिती आणि पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याने यामुळे सिंह यांच्या अडचणी वाढणार आहेत. याप्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी तुरुंगात असलेल्या सचिन वाझे याचा चौकशीसाठी ताबा मिळावा म्हणून न्यायालयात जाण्याचीही शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.