आर्यन खान प्रकरणात नवा धमाका; हॅकर मनीष भंगाळेच्या 'या' दाव्याने खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

आर्यन खान प्रकरणात नवा धमाका; हॅकर मनीष भंगाळेच्या 'या' दाव्याने खळबळ

https://ift.tt/3Ch1D3j
जळगाव: मुंबईतील प्रकरणातील पुरावे टॅम्पर करण्यासाठी आपल्याला पाच लाखांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा आता जळगाव येथील हॅकर याने केला आहे. अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर हिच्या मोबाइलचा सीडीआर काढण्यासाठी ही ऑफर दिल्याचा दावा भंगाळे याने केला. दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खान अटकेत आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. ( ) वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने काही वर्षांपूर्वी मनीष भंगाळे चर्चेत आला होता. आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात त्याने मोठा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे व या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याने सखोल चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे. मनीष भंगाळेने पाच लाखांच्या ऑफरचा दावा करताना धक्कादायक माहिती दिली आहे. '६ ऑक्टोबर रोजी आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्ती मला भेटण्यासाठी जळगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एका नंबरचा सीडीआर काढून मिळेल का?, असे विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर मला दाखवला. तसेच त्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअपही दाखवला. तो बॅकअप आर्यन खान नावाने सेव्ह होता', असे मनीष भंगाळे याने सांगितले. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी पाणी मुरत असल्यानेच आपण मुंबई पोलीस आयुक्तांना याबाबत एक पत्र लिहिले असून सखोल चौकशीची मागणी केल्याचेही भंगाळे म्हणाला. वाचा: पाच लाखांची ऑफर; तो नंबर सॅम डिसुझाचा! 'हे काम केले तर तुला पाच लाख रुपये मिळतील, असे अलोक जैन व शैलेश चौधरी यांनी मला सांगितले. त्यासाठी त्यांनी अ‍ॅडव्हान्स म्हणून मला १० हजार रुपये दिले', असा दावाही भंगाळे याने केला. जैन व चौधरी यांनी जाताना एक नंबर दिला. जो ट्रू कॉलरवर सॅम डिसुझा या नावाने दिसत आहे. या दोघा व्यक्तींनी या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का, असेही आपणास विचारल्याची माहिती मनीष भंगाळे याने दिली. मागील काही दिवसांपू्र्वी आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल याला टीव्हीवर पाहिल्यानंतर या गोष्टीचे गांभीर्य माझ्या लक्षात आले व ही माहिती मी समोर आणली, असे भंगाळेने सांगितले. वाचा: