जळगाव: निवडणुकीच्या सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपाचा समावेश असल्याने जातीयवादी पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान म्हणून पॅनलसाठी आमची तयारी आहे. मात्र तसे न झाल्यास आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढणार असेही पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आज जिल्हा बँक निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल झाले तर ८९ अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ( ) वाचा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली होती. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समितीही निश्चित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह आताचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीची बैठक होऊन ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागावाटप ठरले होते. या जागावाटपाला अंतिम स्वरूप मिळत नाही तोच जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा कोलांटउडी घेत स्वबळाचा नारा दिल्याने समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. वाचा: अन्यथा आम्ही स्वबळावर लढू: प्रदीप पवार जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. यात जे जागावाटप झाले त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती पालकमंत्र्यांकडून देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांच्या आधारे या जागावाटपाची माहिती मिळाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सूत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत असेल तर आमची सोबत येण्याची तयारी आहे. जातीयवादी असलेल्या भाजप या पक्षासोबत आम्ही जाणार नाही. सत्ताधारी मित्रपक्षांना आम्ही विनंती करणार असून विनंती मान्य न झाल्यास आम्ही जिल्हा बँकेची निवडणुक स्वबळावर लढू, अशी घोषणाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले. वाचा: