पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यावरून केंद्र सरकारमध्ये खल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यावरून केंद्र सरकारमध्ये खल

https://ift.tt/2Z2PVe1
नवी दिल्लीः पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी केंद्र सरकारमध्ये खल सुरू आहे, सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. या विषयावर अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात आहे. सर्व बाजूंचा विचार केला जात आहे. केंद्र सरकारने कर कमी केल्यावर राज्यांनीही तो कमी केला पाहिजे, तरच सामान्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळेल, असं सरकारचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलचे दर सोमवारी जैसे थे होते. कारण तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पुढचे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी जागतिक तेल बाजारातील दर पाहण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत पेट्रोल १०५.८४ रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत १११.७७ रुपये प्रतिलिटर होते. मुंबईत डिझेलचे दर १०२.५२ रुपये प्रतिलीटरवर स्थिर राहिले. तर दिल्लीमध्ये रविवारी ९४.५७ रुपये झाले. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर १.४० पैशांनी वाढले. तर १२ आणि १३ ऑक्टोबरला दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. गेल्या २४ दिवसांपैकी १९ दिवसांमध्ये डिझेलच्या दर वाढले आहेत. यामुळे दिल्लीमध्ये ५.९५ रुपये प्रतिलीटर इतकी वाढ झाली आहे. डिझेलची किंमत झपाट्याने वाढत असल्याने देशाच्या अनेक भागांमध्ये इंधनाचे दर हे १०० रुपये प्रतिलिटरहून अधिक आहेत.