मताला प्रत्येकी तीन हजार रुपये वाटले!; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 19, 2021

मताला प्रत्येकी तीन हजार रुपये वाटले!; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

https://ift.tt/3C0BPbK
पंढरपूर: म्हणजे पैशांचा महापूर असे बोलले जाते. यात खरंच तथ्य आहे हे खुद्द सांगोला मतदारसंघाचे शिवसेना आमदार यांनी कबूल केले आहे. १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपण मताला ३ हजार रुपये प्रमाणे पैसे वाटले, शिवाय मटणाच्या पार्ट्या दिल्या त्या वेगळ्या, असा गोप्यस्फोटच पाटील यांनी केला. सहकारमंत्री यांच्यासमक्षच आमदार पाटील यांनी हे विधान केले. ( ) वाचा: सांगोला सहकारी साखर कारखाना आता उद्योजक अभिजीत पाटील यांच्या धाराशीव कारखान्याने २५ वर्षांसाठी चालवायला घेतला आहे. या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आपल्या भाषणात आमदार पाटील यांनी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत कशाप्रकारे पैशांचा महापूर येतो हे सांगण्यासाठी स्वत:चेच उदाहरण दिले. १९९८ मध्ये झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यांना शह देण्यासाठी कशाप्रकारे पैसा खर्च केला, याची माहितीच शहाजीबापू पाटील यांनी जाहीरपणे सांगून टाकली. वाचा: '१९९८ मध्ये सांगोला कारखाना निवडणूक लागली आणि गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह तालुक्यातील सर्व आघाडीच्या नेत्यांनी पॅनल उभे केले. यात मला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे मी त्यांच्या विरोधी पॅनल उभे केले. ते मताला २ हजार रुपये देत असल्याचे कळले मग मी मताला ३ हजार रुपये प्रत्येकी देत ५७ लाख रुपये त्यावेळी वाटले. त्याशिवाय मटणाच्या पार्ट्या दिल्या त्या वेगळ्या. इतकं करूनही तेव्हा मी एकटाच निवडून आलो, बाकी पॅनल पडले', असे सांगत पाटील यांनी सभासदांबाबतही किस्से सांगितले. वाचा: सांगोला कारखान्यातील निवडणुकीचे राजकारण सांगताना आमदार पाटील यांनी कारखाना १० वर्षे बंद राहिल्याबद्दल खंतही व्यक्त केली. अनेक दिग्गज नेते सांगोला कारखान्याशी जोडले गेले होते. असे असतानाही हा कारखाना १० वर्षे बंद होता हे दुर्देव म्हणावे लागेल. या पापात मीही सहभागी होतो, याचा मला नेहमीत खेद वाटतो, असे सांगत आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. १९९८ मध्ये सांगोला कारखान्याची निवडणूक झाली तेव्हा शहाजीबापू पाटील काँग्रेसमध्ये होते. जून २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. वाचा: