पेट्रोल-डिझेल ; चार दिवस दरवाढ केल्यांनतर कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 18, 2021

पेट्रोल-डिझेल ; चार दिवस दरवाढ केल्यांनतर कंपन्यांनी घेतला 'हा' निर्णय

https://ift.tt/3n0CqUp
मुंबई : कच्च्या तेलाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी आज इंधन दरवाढीला ब्रेक दिला. आज सोमवारी कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले. मात्र मागील चार दिवस झालेल्या दरवाढीने मुंबईत पेट्रोल १११ रुपयांवर तर डिझेल १०२ रुपयांवर गेले आहे. आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १११.७७ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०३.०१ रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०६.४३ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११४.४५ रुपये असून बंगळुरात पेट्रोल १०९.५३ रुपये झाले आहे. आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव १०२.५२ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ९४.५७ रुपये इतके झाले आहे. चेन्नईत ९८.९२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९७.६८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव १०३.७८ रुपये असून बंगळुरात डिझेल १००.३७ रुपये झाला आहे. दरम्यान, मागील आठ्वड्याप्रमाणे या आठवड्यात देखील खनिज तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये पहिल्याच दिवशी ब्रेंट क्रूडचा भाव ०.४४ डॉलरने वधारला आणि तो ८५.३० डॉलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.७३ डॉलरने वधारून ८३.०१ डॉलर प्रती बॅरल इतका वाढला होता. अमेरिकन बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.८६ डॉलरने वधारला आणि ८४.८६ डॉलर प्रती बॅरल झाला होता. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.९७ डॉलरने वधारून ८२.२८ डॉलर प्रती बॅरल झाला होता. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल ४.६५ रुपयांनी महागले आहे तर मागील १९ दिवसांत डिझेल ६ रुपयांनी महागले आहे. करोना संकट कमी झाल्याने सरकारकडून वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. बहुतांश राज्यांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असून बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. परिणामी देशात इंधन मागणीत देखील प्रचंड वाढ झाली आहे.