प्रतीक्षा संपली! दशकातील सर्वात मोठ्या IPO ची थोड्याच वेळात घोषणा होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 28, 2021

प्रतीक्षा संपली! दशकातील सर्वात मोठ्या IPO ची थोड्याच वेळात घोषणा होणार

https://ift.tt/3vRRurj
मुंबई : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील पेटीएमच्या जम्बो ची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे. कंपनीकडून तब्बल १८३०० कोटींच्या समभागांची विक्री होण्याची शक्यता आहे. मागील १० वर्षातील हा भांडवली बाजारातील सर्वात मोठा ठरणार आहे.यासाठी प्रती शेअर २०८० ते २१५० रुपये किंमत असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी समभागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर पेटीएमची पालक कंपनी 'वन ९७ कम्युनिकेशन'ने भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे आयपीओचा प्रस्ताव सादर केला होता. गेल्याच आठवड्यात त्याला सेबीने हिरवा कंदील दाखवला. सुरवातीला ही योजना १६००० कोटींच्या आसपास असेल,असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता हा आयपीओ १८३०० कोटींचा असू शकतो, असे बोलले जात आहे. आज गुरुवारी सकाळी ११.३० वाजता कंपनीकडून समभाग विक्री योजनेची (IPO) घोषणा केली जाणार आहे. सेबीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार पेटीएम आयपीओमध्ये १०००० कोटींचे ताजे शेअर इश्यू करणार आहे. तर कंपनीतील गुंतवणूकदार त्यांच्यांकडील ८३०० कोटींचे शेअर विक्री करणार आहेत. असा एकूण १८३०० कोटींची समभाग विक्री जाहीर केली जाईल. हा आयपीओ ८ नोव्हेंबर २०२१ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. पेटीएमचा १८३०० कोटींचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. यापूर्वी जवळपास १० वर्षांपूर्वी कोल इंडिया या सरकारी कंपनीचा १५००० कोटींचा आयपीओ प्राथमिक बाजारात धडकला होता. या योजनेत ७५ टक्के शेअर हे संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आर्थिक वर्षी २०२०-२१ मध्ये पेटीएमला ३१८६ कोटींचा महसूल मिळाला आहे. याच कालावधीत कंपनीला १७०१ कोटींचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या वर्षी कंपनीला ३५४० कोटींचा महसूल मिळाला होता. पेटीएममध्ये Ant ग्रुप आणि अलिबाबा यांची पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशनमध्ये जवळपास ३८ टक्के हिस्सेदारी आहे. सॉफ्टबँकेचा यामध्ये १८.७३ टक्के हिस्सा आहे. तर एलिवेशन कॅपिटलची वन ९७ कम्युनिकेशनमध्ये १७.६५ टक्के हिस्सेदारी आहे. आयपीओच्या नियोजनासाठी पेटीएममध्ये नुकताच संचालक मंडळात फेरबदल केले होते.