
मुंबई: बांधकाम कंत्राटदाराकडून दहा लाखांची उकळणाऱ्या कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव असून ही रक्कम घेताना शहा याला पकडण्यात आले. ( ) वाचा: सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे कंत्राटदाराला येथील कार्यालयाच्या कार्यालयाची भिंती, वनराई पोलीस वसाहत आणि तीन डोंगरी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण हे काम देण्यात आले होते. हे काम सुरू करताच आरटीआय कार्यकर्ते रमेश शहा हे त्या ठिकाणी गेले. बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत शहा याने काम थांबविण्यास सांगितले. हे कंत्राट कसे देण्यात आले, बांधकामात कोणते साहित्य वापरण्यात आले? याची माहिती मिळविण्यासाठी शहा याने शासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज केला. हा अर्ज मागे घेण्यासाठी शहा याने कंत्राटदाराकडे दहा लाखांची मागणी केली. वाचा: दहा लाख रूपये द्यायचे नसल्याने या कंत्राटदाराने पोलिसांत तक्रार केली. त्यावरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला व दहा लाखाची रक्कम स्वीकारताना शहा याला रंगेहाथ अटक केली. गुन्हे शाखा युनिट ९ च्या पथकाने ही कारवाई केली. वाचा: