ACBच्या 'या' कारवाईनंतर फटाक्यांची आतषबाजी!; नेमकं काय घडलं पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 17, 2021

ACBच्या 'या' कारवाईनंतर फटाक्यांची आतषबाजी!; नेमकं काय घडलं पाहा...

https://ift.tt/3qHLXmI
कोल्हापूर: गुंठेवारीचे प्रकरण मिटवण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या नगरपालिकेतील अभियंत्यांसह त्याच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ) रंगेहाथ पकडले. या कारवाईने वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, एसीबीची कारवाई होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या दारातच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. ( ) वाचा: याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार याने इचलकरंजी नगरपालिकेतील नगररचना विभागाकडे गुंठेवारीची एक फाइल दिली होती. ही फाइल मंजूर करण्यासाठी अभियंता याने पंचवीस हजारांची मागणी केली. तडजोडीअंती वीस हजार रुपये त्यांचा पंटर किरण कोकाटे याने स्वीकारले. दुपारी ही रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. वाचा: ही कारवाई पोलीस उपअधीक्षक , शरद पुरे यांच्या नेतृत्वाखाली झाली. सध्या इचलकरंजी नगरपालिकेत कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलन काळातही लाच घेण्याचे उद्योग मात्र सुरू असल्याचे आजच्या कारवाईने स्पष्ट झाले. नगरपालिकेतील या विभागात मोठ्या प्रमाणात लाचखोरी चालत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे कारवाई झाल्याचे कळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. वाचा: