म. टा. प्रतिनिधी, खराडी बायपास रस्त्यावर एका ज्येष्ठ महिलेला सीआयडीचे पोलिस असल्याची बतावणी करून हातचलाखीने दोन लाखांचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( claiming to be ) याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गावरील एका बँकेत निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना आरोपींनी सीआयडीचे पोलिस असल्याची बतावणी केली. या भागात चाकूच्या धाकाने सकाळी चोरट्यांनी एका महिलेकडील असल्याची बतावणी त्यांना चोरट्यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर ज्येष्ठ महिलेला दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, गंठण असा दोन लाख आठ हजार ५०० रुपयांचा ऐवज पिशवीत ठेवल्याचा बहाणा केला. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी हातचलाखीने पिशवीतील दागिने लांबविले. महिलेला पिशवी देऊन चोरटे गेल्यानंतर त्यांनी पिवशी पाहिली. त्यावेळी दागिने नसल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे हे अधिक तपास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-