
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा चर्चेत असतानाच ममता या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार असून या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ( ) वाचा: राष्ट्रीय स्तरावर तिसरी आघाडी उभी करून पंतप्रधान आणि भाजपपुढे पुढील लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान उभे करायचे यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस हे पक्ष पुढाकार घेत असल्याचे संकेत आधीच मिळालेले आहेत. त्यातच ममता बॅनर्जी या कमालीच्या सक्रिय झाल्या असून त्यांनी प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी स्थापन करण्यात आली आणि या आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला. या सरकारला दोन वर्षे पूर्णही झाली आहेत. अशावेळी या आघाडीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या भेटीच्या उद्देशाने ममता या मुंबई दौऱ्यावर जात आहेत. वाचा: ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपासून तीन दिवस त्या मुंबई दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्या भेट घेतील. याशिवाय प्रमुख उद्योगपतींचीही त्या भेट घेणार असून पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होत असलेल्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटचे निमंत्रण त्या देणार आहेत. राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षिक करणं हासुद्धा मुंबई दौऱ्याचा एक उद्देश असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम बंगालशी संबंधित विविध मागण्या घेऊन ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात दिल्लीत दाखल झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्यापुढे ममता यांनी मागण्या ठेवल्या होत्या. दिल्ली दौऱ्यात ममता यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट टाळली होती. वाचा: